व्याप्त काश्मीरमध्ये आणीबाणी झेलमचे पाणी सोडल्याने पूर   

मुज्जफराबाद : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने झेलम नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात सोडले आहे. त्यामुळे झेलम नदीला पूर आला असून व्याप्त काश्मीरमध्ये आणीबाणी जाहीर करावी लागली आहे, असा आरोप पाकिस्तानने रविवारी केला आहे. 
 
मुज्जफराबाद आणि परिसरात झेलम नदीचे पात्र ओसंडून वाहू लागले आहे. त्यामुळे नदीकाठच्या भागात पुराचे संकट निर्माण झाले आहे. भारताने कोणतीही पूर्वसूचना न देता झेलममध्ये अचानक पाणी सोडले. यानंतर हट्टीयन बाला परिसरात आणीबाणी जाहीर करावी लागली. झेलम नदीला पूर आल्याची माहिती प्रार्थनास्थळातील मशिदीतून देण्यात आली. तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, असे म्हटले आहे. दरम्यान, झेलम नदी उत्तर काश्मीरच्या अनंतनाग व बारामुल्ला जिल्ह्यातून पाकिस्तानातील व्याप्त काश्मीरमधील छकोटी परिसरातून प्रवेश करते. दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू नदी कराराला नुकतीच स्थगिती दिली होती. त्यानंतर अचानक झेलम नदीत पाणी सोडल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. स्थानिक प्रशासनाने जलसंकटाबाबतची आणीबाणी जाहीर केली. मुजफ्फराबादपासून सुमारे ४० किलामीटवर हट्टीअन बाला आहे. त्या परिसरात झेलम ओसंडून वाहत असून पूर आला आहे. पुराच्या धोक्याचा इशारा दिल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.  
 

Related Articles